Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदी अन् शहांची प्रकृती ढासळली, राज ठाकरेंकडून भाजपाची पुन्हा 'खिल्ली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 22:11 IST

राज ठाकरेंच्या कार्टुनची उत्सुकता नेटीझन्सला लागली होती. त्याप्रमाणे राज यांनीही कार्टुनच्या माध्यमातून मोदी अन् शहांवर व्यंगात्मक टीका केली.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी एका मथळ्यातून पाच राज्यांच्या निकालावर मत नोंदवले होते. तर, आज नेहमीप्रमाणे आपल्या कार्टुन शैलीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपाध्यक्ष अमित शहांचा समाचार घेतला. 'चिंतन' या मथळ्याखाली राज यांनी अमित शहा आणि मोदींवर टीका केली. देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजप नेते बंद दाराआड चर्चा करत असून मोदी अन् शहांची प्रकृती ढासळल्याचं राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या कार्टुनची उत्सुकता नेटीझन्सला लागली होती. त्याप्रमाणे राज यांनीही कार्टुनच्या माध्यमातून मोदी अन् शहांवर पुन्हा एकदा व्यंगात्मक टीका केली आहे. राज ठाकरेंनी भाजपासह भाजपाच्या पेड आर्मीलाही लक्ष्य केलं आहे. देशातील पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपा आणि त्यांच्या पेड मोदीभक्तांच्या माना खाली गेल्याचं राज यांनी दाखवलं आहे. तर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बंद दरवाज्याआड चर्चा सुरू असून मोदी अन् शहांना डॉक्टरांच्या वेशात दर्शवलं आहे. विशेष म्हणजे दोघेही ऐकमेकांची प्रकृती तपासताना दिसत आहेत. विधानसभा निकालानंतर मोदी अन् शहांची प्रकृती ढासळल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून सांगितलं आहे. तर, या दोघांची प्रकृती पाहून लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज व भाजपाचे ज्येष्ठ नेत्यांना हसू आल्याचा फटकाराही राज यांनी लगावला आहे. दरम्यान, मंगळवारीही राज यांनी व्यंगचित्रातून मोदी अन् शहा यांच्या अहंकाराला तडा गेल्याचं म्हटलं होतं. कधीही भरुन न निघणारा हा पराभव असल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून सूचवलं होतं.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेनरेंद्र मोदीअमित शाह