Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:10 IST2025-11-04T12:07:57+5:302025-11-04T12:10:00+5:30
MNS Sandeep Deshpande And BJP Ameet Satam : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात 'सत्याचा मोर्चा' काढत निवडणूक आयोगावर टीका केली होती. सगळी कारस्थाने आयोगामार्फत सुरू आहेत, मग आम्ही कशी निवडणूक लढवायची? असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. दुबार मतदार आल्यावर त्यांना फोडून काढा असंही राज ठाकरे म्हणाले. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला.
मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी देखील "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असं म्हणत आकडेवारीच शेअर केली. तसेच धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पूर्व या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी देत विरोधी पक्षांना खोचक सवाल विचारला आहे. तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींना टॅग केलं आहे. मनसेने आता 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी अमित साटम यांच्या मतदार संघातील बोगस घोटाळा" असं म्हणत इफ्तार पार्टीमधील भाजपा नेत्यांचा फोटो शेअर केला आहे. अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस मतदारांची यादी दिली आहे.
खास अशिशुद्दीन यांच्या साठी अमित साठम यांच्या मतदार संघातील बोगस घोटाळा pic.twitter.com/oUpytL1vqe
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 4, 2025
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट करत "भाजपा नेते आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाने आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावी" अशी मागणी केली आहे
"मनसेने मतदार यादी, बोगस मतदार किंवा दुबार मतदार यादीवरुन निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना राग येतो,चीड येते.. आणि त्यांचे नेते निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात.यावरुन भारतीय जनता पक्षाचा खरा जीव मतदार यादीत आहे, हे स्पष्ट दिसतय. म्हणूनच भाजपचे नेते माननीय आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाने आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची मागणी आहे" असं गजानन काळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
प्रति,
केंद्रीय निवडणूक आयोग
भारत सरकार
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य
विषय - भाजप नेते आशिष शेलार यांना आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करणेबाबत …
महोदय,
मनसेने मतदार यादी, बोगस मतदार किंवा दुबार मतदार यादीवरुन निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाला काही…— Gajanan Kale (@MeGajananKale) November 4, 2025
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
सत्याचा मोर्चात राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचा उल्लेख करताना म्हणताना कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी या मतदारसंघांचा उल्लेख केल्यावर आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदार तुम्हाला दिसले नाहीत का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता.