आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात चोरी; दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 07:14 AM2024-05-15T07:14:08+5:302024-05-15T07:15:05+5:30

आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरामध्ये ठेवलेली दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार झाला आहे.

mla ravi rana khar house servant ran away with two lakhs in cash | आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात चोरी; दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार

आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात चोरी; दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरामध्ये ठेवलेली दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार झाला आहे. अर्जुन मुखिया असे आरोपी नोकराचे नाव असून याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांचे स्वीय सहायक संदीप ससे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रवी राणा हे घरखर्चासाठी काही रक्कम त्यांच्याकडे देतात. या रकमेसह कागदपत्रे, साहित्य हे फलॅटच्या बेडरूममधील कपाटात ठेवतात. या कपाटाची चावी बाजूला असलेल्या हँगरला असते. फेब्रुवारी महिन्यात रवी राणा यांनी ससे यांच्याकडे दोन लाख रुपये घरखर्चासाठी दिले होते. ससे यांनी ही रक्कम फ्लॅटच्या बेडरूममधील कपाटात ठेवली होती. 

राणा यांनी बिहार, दरभंगाचा रहिवासी अर्जुन मुखिया याला दहा महिन्यांपूर्वी घरकामासाठी ठेवले होते. तो नोकरांसाठी असलेल्या खोलीमध्ये राहायचा. त्याची नजर रकमेवर पडताच त्याची नियत फिरली. या रकमेवर हात साफ करून मार्चमधील दुसऱ्या आठवड्यात होळीनिमित्ताने कुटुंबीयांना भेटायला जातो, असे सांगून गावी गेलेला मुखिया परतलाच नाही. 

तो कॉल पण उचलत नव्हता. खर्चासाठी पैसे आवश्यक असल्याने ससे यांनी १३ मे रोजी खर्चासाठी पैसे हवे असल्याने बेडरूममधील कपाट उघडले असता त्यांना दोन लाख रुपये सापडले नाहीत. ससे यांनी ही माहिती रवी राणा यांना दिली. नोकर मुखिया यानेच ही रक्कम चोरी केल्याची त्यांची खात्री पटताच पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

Web Title: mla ravi rana khar house servant ran away with two lakhs in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.