महानगर दंडाधिकारी निलंबित

By Admin | Updated: March 13, 2015 01:15 IST2015-03-13T01:15:05+5:302015-03-13T01:15:05+5:30

: विक्रोळी न्यायालयाचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एम. शेख यांना उच्च न्यायालय प्रशासनाने गुरुवारी निलंबित केले. शेख यांची विभागीय चौकशी सुरु असून तोपर्यंत ते निलंबितच राहतील.

Metropolitan Magistrate suspended | महानगर दंडाधिकारी निलंबित

महानगर दंडाधिकारी निलंबित

मुंबई : विक्रोळी न्यायालयाचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एम. शेख यांना उच्च न्यायालय प्रशासनाने गुरुवारी निलंबित केले. शेख यांची विभागीय चौकशी सुरु असून तोपर्यंत ते निलंबितच राहतील. शेख यांच्याविरोधातील तक्रारी न्यायालय प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार झालेल्या गुप्त चौकशीत तथ्य आढळल्याने तूर्तास त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दिवसभर शेख यांच्या निलंबनाची चर्चा सुरु होती. रात्री उशीरा उच्च न्यायालयाने त्यांच्या निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Metropolitan Magistrate suspended