Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या… मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:03 IST2026-01-31T13:02:06+5:302026-01-31T13:03:09+5:30

Mumbai Local Train Mega Block on 1 Feb: मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान मेगाब्लॉक असेल. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील. 

Mega block tomorrow on the fast line between Thane-Kalyan station | Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या… मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या… मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर

Mumbai Local Mega Block: रविवारी, १ फेब्रुवारी २०२६ मेगा ब्लॉक संदर्भात रेल्वे प्रशासनाने महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक प्रामुख्याने रेल्वे रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी घेण्यात येत असून, यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे: ठाणे-कल्याण जलद मार्गावर वाहतुकीत बदल

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या कालावधीत मेगा ब्लॉक असेल. या पाच तासांच्या काळात अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहील.

धीम्या मार्गावरून वळवल्या जाणार गाड्या

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाड्या आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त सर्व स्थानकांवर थांबतील, ज्यामुळे त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप जलद गाड्या देखील धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे: कुर्ला ते वाशी दरम्यान लोकल सेवा बंद

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी हा रविवार अत्यंत कठीण जाणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन फेऱ्या पूर्णतः बंद राहतील.

प्रवाशांसाठी विशेष लोकलची सोय

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने काही विशेष व्यवस्था केली आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या टप्प्यात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातील. तसेच, हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्स-हार्बर मार्गावरून म्हणजे ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.

Web Title : ठाणे-कल्याण फास्ट लाइन पर मेगाब्लॉक, हार्बर लाइन भी प्रभावित

Web Summary : मध्य रेलवे पर ठाणे-कल्याण फास्ट लाइन पर रविवार को मेगाब्लॉक। कुर्ला-वाशी के बीच हार्बर लाइन सेवाएं भी बाधित। लोकल ट्रेनें बदले रूट से चलेंगी। हार्बर लाइन पर सीमित सेवाएं उपलब्ध।

Web Title : Megablock on Thane-Kalyan fast line, Harbour line also affected

Web Summary : Central Railway megablock on Thane-Kalyan fast line on Sunday. Harbour line services also disrupted between Kurla-Vashi. Local trains will run on diverted routes. Limited services available on Harbour line.