Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकज भुजबळ, बबनदादा शिंदे रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:43 AM2019-10-03T11:43:20+5:302019-10-03T12:26:53+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019: NCP announces second list of 20 candidates | Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकज भुजबळ, बबनदादा शिंदे रिंगणात

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकज भुजबळ, बबनदादा शिंदे रिंगणात

Next

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीत नांदगावमधून पंकज भुजबळ, माढ्यातून बबनदादा शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तम जानकर यांना माळशिरस येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीनं यंदा उमेदवारीमध्ये तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. 

जळगाव शहर- अभिषेक पाटील, बाळापूर- संग्राम गावडे, कारंजा- प्रकाश डहाके, मेळघाट- केवळराम काळे, अहेरी- धर्मरावबाबा आत्राम, दिग्रस- तारीक शमी, गंगाखेड- मधुसुदन केंद्रे, कन्नड- संतोष कोल्हे, नांदगाव- पंकज भुजबळ, बागलाण- दीपिका चव्हाण, देवळाली- सरोज अहिरे, कर्जत- सुरेश लाड, खेड आळंदी- दिलीप मोहिते, मावळ- सुनील शेळके, पिंपरी- सुलक्षणा शिलावंत, आष्टी- बाळासाहेब आजबे, माढा- बबनदादा शिंदे, मोहोळ- यशवंत माने, माळशिरस- उत्तमराव जानकर, चंदगड- राजेश पाटील या 20 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. 

तत्पूर्वी राष्ट्रवादीने आपल्या 77 उमेदवारांची याची बुधवारी रात्री जाहीर केली होती. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात डॉ. किरण लहामटे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, शेवगावमध्ये प्रताप ढाकणे, पारनेरमध्ये निलेश लंके, अहमदनगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप, तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. तर मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ठाणे मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे. 

या 77 जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान 19 विधानसभा आणि 1 विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना,भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीतच राष्ट्रवादीने अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप - सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: NCP announces second list of 20 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.