Maharashtra Politics : शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 11:42 IST2023-05-26T11:33:00+5:302023-05-26T11:42:04+5:30
Maharashtra Politics : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

Maharashtra Politics : शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला
मुंबई- मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचा खुराडा असतो. ते कधीही कापले जातात, तो पक्ष नाहीच आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटासह भाजपवर टीका केली.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ७५ रुपयांचं नाणे जारी करणार; काय आहे स्पेशल?
संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाला लोकसभेच्या पाच जरी जागा भाजपने दिल्या तरी भरपूर आहे. मागच्या लोकसभेमध्ये आमचे १९ खासदार होते, आमचा हा आकडे लोकसभेत कायम राहिलं. शिंदे गटाने ४८ जागा लढवायला पाहिजेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
२८ मे रोजी नव्या संसदेचे उद्धाटन होणार आहे, यावरुरन राऊत यांनी भाजपला टोला लगावला. नव्या संसदेचे उद्घाटन यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा विषय नाही, हा विषय भारतीय लोकशाही आणि संविधानाचा आहे नैतिकतेचा हा विषय आहे. उठ सूट सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि याचिका दाखल करायची. हा विरोधासाठी विरोध नाही, हा विरोध आहे राष्ट्रपती आणि संविधानाच्या सन्मानासाठी, असंही राऊत म्हणाले.
नव्या संसद भवनच्या निमंत्रण पत्रिका बघितली तर उपराष्ट्रपतींचे नाव सुद्धा नाही राष्ट्रपतींना निमंत्रण तर द्या. राष्ट्रपतींना का नाही बोलावलं त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. हा कुठलाही खासगी कार्यक्रम नाही. हा देशाचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पंतप्रधानांनी समोर येऊन या संदर्भात बोलले पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, अमित शहा म्हणतात ते बरोबर आहे, सगळ्यांना निमंत्रण मिळालं आहे. मला सुद्धा खासदार आहे म्हणून निमंत्रण आले आहे. मोठ्या माणसांच्या घरी लग्न असेल तर गावभर बोलवलं जातं, जेवण आहे कॉकटेल डिनर आहे म्हणून त्यांच्या लोक गावभर फिरतात आणि निमंत्रण देतात. लालकृष्ण अडवाणी यांचा आयुष्य या संसदेत गेलं त्यांच्यामुळे भाजपला अच्छे दिन मिळाले ते आडवाणी कुठे गेले ?, असा सवालही संजय राऊत यांनी केला.