Maharashtra Government: सरकारच्या अग्निपरीक्षेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 08:29 AM2019-11-30T08:29:00+5:302019-11-30T08:29:19+5:30

आज बहुमत दिन आहे. सरकारकडे १७० पेक्षा अधिक संख्याबळ असणार आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Before the government's trial, Sanjay Raut opponents were summoned, saying... | Maharashtra Government: सरकारच्या अग्निपरीक्षेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले की...

Maharashtra Government: सरकारच्या अग्निपरीक्षेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले की...

googlenewsNext

मुंबई - राज्यातील उद्धव ठाकरे सरकारच्या अग्निपरीक्षेचा आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्यामुळे सभागृहात ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारकडे १७० पेक्षा अधिक संख्याबळ असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. दुपारी २ वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन भरणार आहे. त्यावेळी बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. 

नेहमीप्रमाणे आजही संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटलं की, आज बहुमत दिन आहे. सरकारकडे १७० पेक्षा अधिक संख्याबळ असणार आहे. हमसे जमाना खुद है, जमाने से हम नही अशा शायराना अंदाजामध्ये संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊतांनी भूमिका महत्त्वाची राहिली आहे. ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊतांसोबतच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनीही ट्विट करुन शायरी म्हटली आहे. सितारो से आगे जहॉं और भी है, अभी इश्क के इम्तिहॉं और भी है असं त्यांनी सांगितले आहे. 

अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. आज दुपारी २ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय होईल.

त्यानंतर, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडतील. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी सकाळी ११ वाजता पुन्हा विधानसभेचे अधिवेशन भरेल. त्यात आधी अध्यक्षांची निवड केली जाईल. विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. दुपारी ४ वाजता राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर, अधिवेशन संस्थगित होईल. नागपूर अधिवेशन एक आठवड्याचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणार आहे. याचा अर्थ, केवळ एक आठवड्याचे हे अधिवेशन असेल. 
 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Before the government's trial, Sanjay Raut opponents were summoned, saying...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.