Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 09:59 PM2019-10-04T21:59:49+5:302019-10-04T22:02:59+5:30

मनसेने एकूण 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसचं मनसेची विधानसभेची पहिली प्रचार सभा 9 ऑक्टोबरला असून पुण्यातून प्रचारसभेचा नारळ फुटणार आहे.

Maharashtra Election 2019: Raj Thackeray rally; There will be 15 to 20 meetings across in maharashtra | Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा

Next

मुंबई: 'कोहिनूर' प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केल्यापासून मौनात गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जे काही बोलायचायं ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलेलं असं सागितले होते. मनसेने एकूण 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसचं मनसेची विधानसभेची पहिली प्रचार सभा 9 ऑक्टोबरला असून पुण्यातून प्रचारसभेचा नारळ फुटणार आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे. 

राज ठाकरे विधानसभेसाठी एकूण 15 ते 20 जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहीती समोर आली आहे. यामध्ये पुण्यातून  9 ऑक्टोबरला प्रचारसभेचा नारळ फुटणार असून 19 ऑक्टोबरला ठाण्यात निवडणुकीची शेवटची सभा होणार आहे. तसेच राज ठाकरे मुंबईसह नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील सभा घेणार आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019: Raj Thackeray rally; There will be 15 to 20 meetings across in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.