Maharashtra Election 2019: Our alliance Rotten and stops in 124 seats; Raj Thackeray slams Shiv Sena | Maharashtra Election 2019: आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला
Maharashtra Election 2019: आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

मुंबई: गेले पाच वर्ष सत्तेत राहून उचक्या लागल्यावर राजीनामे देऊ अशी भाषा बोलणाऱ्यांचे राजीनामे शेवटपर्यत खिश्यातच राहीले. शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्ष सत्तेत सडली आणि 124 जागांवर अडली असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी शिवसेनेच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची गोरेगाव येथे जाहीर सभा झाली, त्यात ते बोलत होते. 

राज ठाकरे म्हणाले की, गेले पाच वर्ष शिवसेनेचे राजीनामे खिश्यातून काढण्यातचं गेले. तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमची एवढी वर्ष सत्तेत राहून युती सडली असल्याचे सांगत शिवतीर्थावर झालेल्या सभेत आरोळी ठोकली होती. मात्र आता आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली असल्याची परिस्थिती झाली असल्याचे सांगत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. त्याचप्रमाणे या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना केले. 

आरे मधील एका रात्रीत झाडे कापली जातं होती, तेव्हा शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम ही कारवाई थांबवू शकले नाही. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख बोलतायेत आमच्या हातात सत्ता आली तर आरेचं जंगल वाचवू. आम्हाला मुर्ख समजता का? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच मेट्रो कारशेडसाठी कुलाब्यातील पोर्ट ट्रस्टची जमीन असताना आरेमध्ये जमिनीचा घाट का? मेट्रोची सुरुवात होते तिथे असणारी ही जागा नाकारली का जात आहे? आरेमधील जमीन बळकावून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव साधतायेत. जगात सर्वाधिक जास्त बिबटे नॅशनल पार्कमध्ये आहे. बोरिवलीतील नॅशनल पार्क सगळ्या बाजूने पोखरलं जातं असल्याचे देखील राज ठाकरेंनी यावेळी सांगतिले.


Web Title: Maharashtra Election 2019: Our alliance Rotten and stops in 124 seats; Raj Thackeray slams Shiv Sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.