Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:19 AM2019-10-15T11:19:34+5:302019-10-15T11:20:20+5:30

म.बसवेश्वर यांचे स्मारक, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद आणि उमाजी नाईक यांचे स्मारक येत्या ५ वर्षात पूर्ण करणार

Maharashtra Election 2019: 'Mahatma Phule, Savitribai Phule and Veer Savarkar to try to give Bharat Ratna' | Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून आज संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये विविध मुद्द्यावर भाजपाकडून जनतेला आश्वासन देण्यात आली आहे. यामध्ये राज्याची अस्मिता आणि अभिमानास्पद वारसा जोपसण्यासाठी भाजपाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. 

तसेच गेल्या ५ वर्षात अरबी समुद्रातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आणि इंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक पूर्ण करणार असल्याची घोषणा करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रत्येक तालुक्यातील महिला बचत गटांना खादी ग्रामोद्योगचे उद्योग देणार असल्याचंही आश्वासनही देण्यात आलं आहे. 

मंगळवेढा येथे म.बसवेश्वर यांचे स्मारक, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद आणि उमाजी नाईक यांचे स्मारक येत्या ५ वर्षात पूर्ण करणार. तसेच मुबंईत अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य स्मारक आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील ५ वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा भाजपाने केली. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि रामदास यांची जन्मस्थाने मराठवाड्यात आहेत. ज्ञानेश्वरी लिहिल्याचे स्थानही मराठवाड्यात आहे. या पाचही स्थानांचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करणार असल्याची घोषणा भाजपाने केली आहे. 

कै. सुधीर फडके, ग.दि माडगूळकर, पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष टपाल तिकीटे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं भाजपाने सांगितले आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात येईल. संगणकीय भाषा म्हणून मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्यात येईल. राज्यातील अहिराणी, आगरी, खान्देशी, वऱ्हाडी, झाडी, पोवरी, बंजारा, मालवणी, कातकरी, हलबा, कैकाडी अशा विविध बोलीभाषेचे जतन करण्यात येईल आणि त्यासाठी संवर्धन केंद्र बनविण्यात येतील असं भाजपाने सांगितले आहे. तसेच वारकऱ्यांसाठी १०० कोटींची तरतूद करून पंढरपुरात आणखी सुविधा देण्यात येणार असल्याचं सांगितले आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: 'Mahatma Phule, Savitribai Phule and Veer Savarkar to try to give Bharat Ratna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.