Maharashtra Election 2019 : great opposition will see - Sanjay Raut | Maharashtra Election 2019 : आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा- संजय राऊत
Maharashtra Election 2019 : आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा- संजय राऊत

मुंबई- शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सहकुटुंब भांडुप येथील एकविरा क्रीडांगण येथील मतदान केंद्रात येऊन मतदान केलं. त्यानंतर त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, आज महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचा मतदान होईल. प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठी लढायची असते, आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा, असं आम्हाला वाटतं. जर विरोधी पक्ष असेल तर सरकारवर वचक राहतो. त्यामुळे विरोधी पक्षाला मी शुभेच्छा देतो.

यासोबतच ज्याप्रमाणे भाजपाच्या प्रशांत परिचारक आणि राम कदम या दोघांवर कारवाई झाली, तशीच कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्यावरही व्हावी, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी एकप्रकारे भाजपाला   राऊत यांनी टोला लगावला आहे. महाराष्ट्राची जनता इच्छुक असेल तर आदित्य ठाकरे नक्की मुख्यमंत्री बनतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 


Web Title: Maharashtra Election 2019 : great opposition will see - Sanjay Raut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.