‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ नेटकऱ्यांची ‘शिव’गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:40 AM2019-11-27T06:40:49+5:302019-11-27T06:41:08+5:30

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या गोंधळावर सोशल मीडियावरही तुफान प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

'This is the Maharashtra of Chhatrapati!' | ‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ नेटकऱ्यांची ‘शिव’गर्जना

‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ नेटकऱ्यांची ‘शिव’गर्जना

Next

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या गोंधळावर सोशल मीडियावरही तुफान प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. विशेषत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणा-या अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवितानाच नेटकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

‘हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे!’ अशी ‘शिव’गर्जना करत भाजपवर नेटकºयांनी टीकास्त्र उगारले. समाजमाध्यमांपैकी फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर मंगळवारी सकाळपासूनच हास्यविनोद सुरू होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आल्यानंतर तर नेटकरी अधिकच सक्रिय झाले. ‘आपल्यातला मावळा शत्रूच्या कळपात सामील करायचा, यालाच म्हणतात गनिमी कावा... हा छत्रपतींचा ‘महाराष्ट्र’ आहे, ‘गोवा’ नाही... याचा अर्थ बहुतेक सर्वांना समजला असावा... न कळणारा विषय साहेब...’ अशा आशयाच्या पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागल्या.

शरद पवार यांचा ‘टेÑंड’

सोशल मीडियावर प्रत्येक तिसरी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी निगडित होती. विधानसभा निवडणुकीच्या पावसातल्या प्रचारापासून ‘महाविकास आघाडी’च्या प्रत्येक डावपेचाबाबत शरद पवार यांचा ‘संकटमोचक’ म्हणून उल्लेख केला जात होता.
‘महाविकास आघाडी’चे कौतुक करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेटकºयांनी तुफान हल्ला चढविला.

Web Title: 'This is the Maharashtra of Chhatrapati!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.