Mahashivratri 2026 Special Train: महाशिवरात्रीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन अभिषेक, पूजा करतात. देशभरात शेकडो शिवमंदिरे असून, या सर्व मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. यंदा, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री आहे.
महाशिवरात्रीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाशिवरात्री २०२६ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक ०११२९/०११३० मुंबई CSMT- सावंतवाडी रोड- मुंबई सीएसएमटी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
महाशिवरात्रीला कोकण रेल्वेवर ६ विशेष ट्रेन
- ट्रेन क्रमांक ०११२९ मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड विशेष ट्रेन शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६, गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६, आणि शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई सीएसएमटीहून रात्रौ १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहोचेल.
- ट्रेन क्रमांक ०११३० सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी विशेष ट्रेन शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६, गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ आणि शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी रोडवरून सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ०५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
- ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनवर थांबेल.
- ट्रेनची संरचना: एकूण २२ कोच असतील. टू टियर एसी ०१ कोच, थ्री टियर एसी ०५ कोच, स्लीपर १० कोच, जनरल - ०४ कोच, एसएलआर-०२. वरील गाड्यांच्या थांब्या आणि वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.
- ट्रेन क्रमांक ०११३० चे बुकिंग १० फेब्रुवार २०२६ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम्स (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Web Summary : Konkan Railway will operate six special trains between Mumbai and Sawantwadi for Maha Shivratri 2026. These trains will run on select dates in February to manage passenger traffic, with bookings starting February 10th.
Web Summary : महाशिवरात्रि 2026 के लिए कोंकण रेलवे मुंबई और सावंतवाड़ी के बीच छह विशेष ट्रेनें चलाएगा। यात्रियों की भीड़ को संभालने के लिए ये ट्रेनें फरवरी में चुनिंदा तारीखों पर चलेंगी, बुकिंग 10 फरवरी से शुरू होगी।