इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 06:22 IST2024-04-26T06:21:10+5:302024-04-26T06:22:35+5:30
सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी तुमच्या विभागातील आमचे सर्व स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास पूर्ण ताकदीने समर्थन करत आहेत.

इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार
मुंबई - महाविकास आघाडीचे उत्तर-पूर्व मतदारसंघातील उमेदवार संजय पाटील यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंब्याचे अधिकृत पत्रक समाजवादी पक्षाने गुरुवारी काढले.
समाजवादी पक्ष इंडिया आघाडीसोबत असून सांप्रदायिक शक्तीला व हुकूमशाहीला बाजूला सारून देशात संविधान वाचवणे, एकाअर्थाने लोकशाहीला वाचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजवादी पक्ष मुंबई प्रदेशातील इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी तुमच्या विभागातील आमचे सर्व स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास पूर्ण ताकदीने समर्थन करत आहेत.