व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का..! भाजपाने उडवली राज ठाकरेंची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:57 IST2019-04-19T15:56:55+5:302019-04-19T15:57:36+5:30
प्रचाराचं नवीन तंत्र राज ठाकरेंनी आणलं असली तरी हेच तंत्र त्यांच्यावर बुमरॅंग झाल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का..! भाजपाने उडवली राज ठाकरेंची खिल्ली
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत. यातच महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आणखी जोरात तापू लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमधून व्हिडीओ दाखवत भाजपावर टीका करताना मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना पाहायला मिळत आहेत. यातून सोशल मिडीयावर देखील लाव रे तो व्हिडीओ हे राज ठाकरेंचे वाक्य जोरदार धुमाकूळ घालतंय.
भारतीय जनता पार्टीकडून राज ठाकरेंच्या या वाक्याचा उपयोग मनसेला टोला लगावला आहे. काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का ...! "मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हप्ते" असं म्हणत लाव रे व्हिडीओ असं ट्विट करत राज ठाकरे यांच्या भाषणामधून याची मनसेची खिल्ली उडवली आहे.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराची मोहीम उघडली आहे. याच सभांमध्ये राज ठाकरे यांच्याकडून नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी केलेल्या विधानांचा वापर करत व्हिडीओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भाजपाला धारेवर धरलं आहे. राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरु असताना त्यांचे ''लाव रे तो व्हिडीओ'' हे वाक्य सोशल मीडियावर हिट ठरताना दिसत आहे. अनेक यूजर्सनी तर हॅशटॅग करून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत धमाल उडवली आहे. भाजपाने या हॅशटॅगचा वापर करत मनसेची खिल्ली उडवली आहे.
काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का ...!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 18, 2019
"मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हप्ते" #लावरेव्हिडीओ @mnsadhikrut@RajThackeraypic.twitter.com/ZjRfYytZgj
मात्र हेच वाक्य वापरत भाजपा कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयामध्ये मनसेच्या कामांची तसेच मनसेविरोधी बातम्यांचे व्हिडीओ पसरुन जोरदार मोहीम उघडली आहे. मागे पुण्यामध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून साडी चोरण्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर कल्याण-डोंबिवली येथे मनसेच्या नगरसेवकांवर हफ्ते वसुली करत असल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला होता. नेमके असेच काही व्हिडीओ घेऊन राज ठाकरे यांच्या भाषणामध्येच राज मनसेची खिल्ली उडवत असल्याचं दाखविण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराचं नवीन तंत्र आणलं आहे. या व्हिडीओ दाखवण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने राज यांच्या सभांमध्ये ते याच पॅटर्नचा वापर करत आहे. या सभांमध्ये त्यांचे व्हिडिओच्या पूर्वीचे बोलून झाल्यावर संबंधित तंत्रज्ञाला ते लाव रे तो व्हिडीओ असं त्यांच्या शैलीत सांगतात. त्यांची हीच शैलीही श्रोत्यांना भुरळ घालत असली तरी हेच तंत्र त्यांच्यावर बुमरॅंग झाल्याचं पाहायला मिळत आहे.
"मनसे कार्यकर्ते साडी चोरताना" #लावरेव्हिडीओ@mnsadhikrut@RajThackeraypic.twitter.com/VJx04xI1tz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 19, 2019