६00 लोकल फेऱ्यांना लेटमार्क

By Admin | Updated: June 8, 2015 02:10 IST2015-06-08T02:10:26+5:302015-06-08T02:10:26+5:30

डीसी-एसी परावर्तनाला परवानगी देतानाच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सीएसटी ते कुर्ला दरम्यान नऊ ठिकाणी १५ किमी प्रतितास वेगमर्यादा घालून दिली.

Lettermark for 600 local rounds | ६00 लोकल फेऱ्यांना लेटमार्क

६00 लोकल फेऱ्यांना लेटमार्क

मुंबई : डीसी-एसी परावर्तनाला परवानगी देतानाच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सीएसटी ते कुर्ला दरम्यान नऊ ठिकाणी १५ किमी प्रतितास वेगमर्यादा घालून दिली. हे परावर्तन कायमस्वरुपी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवारी (५ जून) सकाळी तीन तास चाचणीही घेण्यात आली. मात्र घेण्यात आलेली चाचणी आणि नऊ ठिकाणी असलेली वेगमर्यादा त्यामुळे लोकल सेवेचा चांगलाच बोऱ्या वाजला. यामुळे तब्बल ६00 फेऱ्यांना लेटमार्क लागल्याचे समोर आले आहे. हा अनुभव पाहता आता नऊऐवजी चार ठिकाणीच वेगमर्यादा आखून देण्यात आली असून नवी वेगमर्यादा ५0 किमी प्रतितास करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसटी ते ठाणे दरम्यान डीसी ते एसी परावर्तन केले जाणार आहे. तत्पूर्वी या परावर्तनासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सीएसटी ते कुर्ला दरम्यान नऊ ठिकाणी १५ किमी प्रतितास वेगमर्यादा आखून दिली.
शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून हे परावर्तन कायमस्वरुपी केले जाणार होते. त्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून पाहणी करतानाच तीन तास चाचणी घेण्यात आली आणि त्याचाच फटका मध्य रेल्वे प्रवाशांना बसला. तब्बल ६00 लोकल फेऱ्यांना उशिराने धावल्या आणि दोन लोकल रद्द झाल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. वेगमर्यादा आणि करण्यात आलेल्या पाहणीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकल सेवा रद्द झाल्याने मध्य रेल्वेने शनिवारी आखलेला परावर्तनाचा मुहूर्त रविवारी रात्रीपर्यंत ढकलला. तोपर्यंत रेल्वे महाव्यवस्थापकांकडून वेगमर्यादा वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
 

Web Title: Lettermark for 600 local rounds