आषाढीनिमित्त विठुरायाकडे जाण्यासाठी लालपरी सज्ज; ठाण्यातून ६० जादा बसचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 01:15 PM2023-06-09T13:15:12+5:302023-06-09T13:17:46+5:30

आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला वारकरी संप्रदाय अक्षरशः आतुर झालेला असतो.

lalpari ready to go to vithuraya on the occasion of ashadhi planning of 60 additional buses from thane | आषाढीनिमित्त विठुरायाकडे जाण्यासाठी लालपरी सज्ज; ठाण्यातून ६० जादा बसचे नियोजन

आषाढीनिमित्त विठुरायाकडे जाण्यासाठी लालपरी सज्ज; ठाण्यातून ६० जादा बसचे नियोजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई/ठाणे:आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला वारकरी संप्रदाय अक्षरशः आतुर झालेला असतो. विठूचा गजर करत लाखो भक्तगण पायी पंढरपूरला जातात. ज्यांना पायी चालत जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातून जादा ६० बसचे नियोजन केले आहे. या बसचे ग्रुप आरक्षण आणि तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.  

आतापर्यंत दोन ग्रुप बुकिंग झाले आहेत. या दिवसात पंढरपूरला जाण्यासाठी बसची जशी मागणी होईल, तशी व्यवस्था केली जाणार आहे. पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर आहेत. त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.                      
  
येत्या २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरिता राज्य परिवहन ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोबिंवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरीवला नॅन्सी कॉलनी येथून येत्या २५ जून २०२३ पासून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २९ जून ते ०४ जुलै २०२३ पासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे.

सवलतींचा लाभ घ्या

- सोडण्यात येणाऱ्या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एक महिन्याअगोदर या पद्धतीने उपलब्ध आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर केलेली आहे.

- यावर्षी राज्य सरकारकडून प्रवाशांकरिता ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. 

- त्यामुळे भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेकरिता बसने प्रवास करून या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागाकडून करण्यात येत आहे.

२५ जूनपासून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २९ जून ते ०४ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे.

ठाणे आगार १     १० 
ठाणे २ येथून     ८ 
कल्याण    ९ 
भिवंडी, मुरबाड, 
विठ्ठलवाडी     ७ 
शहापूर आणि वाडा     ६


 

Web Title: lalpari ready to go to vithuraya on the occasion of ashadhi planning of 60 additional buses from thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.