Join us  

'मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाची महाराष्ट्रात विक्री झाली तर...'; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 8:13 PM

मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे.

मुंबई: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. आज के शिवाजी महाराज नरेंद्र मोदी या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना जय भगवान गोयल यांना दिल्लीत राहून कळणार नसल्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राची जनता काय वाचायचं काय नाही हे न समजण्याइतकी अडणी नाही असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. 

... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप

जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मला महाराष्ट्रात 'आज के शिवाजी महाराज नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणीही विकत घेणार नसून माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. तसेच महाराष्ट्रातील लोकांना काय वाचायचं काय नाही आणि  काय विकयाचं व काय विकू द्यायचं नाही हे कळण्याइतकी अडाणी नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आज के शिवाजी महाराज नरेंद्र मोदी पुस्तक आली किंवा पुस्तकांच्या दुकानांवर दिसली तर त्याची किंमत जय भगवान गोयल यांना नाही तर महाराष्ट्रातील भाजपाला मोजावी लागेल असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावर उदयनराजेंची सडेतोड भूमिका

मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी देशात दहशतवादी हल्ले व्हायचे. मुंबई, दिल्लीसह देशभरात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवले जायचे. अगदी संसदेवर हल्ले करण्यापर्यंत दहशतवाद्यांची मजल गेली होती. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही मोठा दहशतवादी झालेला नाही, असा दावा गोयल यांनी केला. पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात झालेल्या हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राइकनं प्रत्युत्तर देण्याची धमक मोदींनी दाखवली असल्याचे जय भगवान गोयल यांनी सांगितले.

 'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच पुस्तकाला 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी जय भगवान गोयल दर्शवली आहे.

टॅग्स :आज के शिवाजी नरेंद्र मोदीजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रभाजपा