बहिणीच्या कौटुंबिक वादात ढवळाढवळ बेतली जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:06 IST2021-07-27T04:06:50+5:302021-07-27T04:06:50+5:30

मुंबई: बहिणीच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत तिला पतीपासून दूर करणे रविवारी भावाच्या जीवावर बेतले. याचा राग मनात ठेवत भावजीने ...

Interference in sister's family dispute on Betli Jiva | बहिणीच्या कौटुंबिक वादात ढवळाढवळ बेतली जीवावर

बहिणीच्या कौटुंबिक वादात ढवळाढवळ बेतली जीवावर

मुंबई: बहिणीच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत तिला पतीपासून दूर करणे रविवारी भावाच्या जीवावर बेतले. याचा राग मनात ठेवत भावजीने त्याचा गळा चिरला; मात्र एमएचबी कॉलनी पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्याला गजाआड केले.

संदीप राजपूत (२५) असे या मेव्हण्याचे नाव आहे.

संदीपचा भावजी भरत मकवाना (३५) याला दारूचे व्यसन होते आणि त्याच कारणावरून भरतचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाले. त्यामुळे ती पतीचे घर सोडून गेली दीड वर्षे भाऊ राजपूत याच्या बोरिवली पश्चिम येथील घरी राहत होती. मकवाना याने तिला घरी परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले; मात्र राजपूत तिला परत पाठविण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे याचा वचपा काढण्यासाठी रविवारी बोरिवलीच्या एसर गार्डन परिसरात त्याने राजपूतला बोलावले. तिथे त्याला गांजा प्यायला देत नंतर सुरीने त्याचा गळा चिरून त्याच्यावर दारूच्या फुटक्या बाटलीने वार करत पसार झाला.

याबाबत एमएचबी कॉलनी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासात मकवाना याला गजाआड केले. आरोपीला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येळे यांनी दिली आहे.

Web Title: Interference in sister's family dispute on Betli Jiva