CoronaVirus News :कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ लाखांचे विमा कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 03:06 AM2020-08-19T03:06:31+5:302020-08-19T06:55:47+5:30

सामाजिक संस्था, संघटनांच्या कर्मचा-यांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

Insurance cover of Rs 25 lakh for cremated corona patient | CoronaVirus News :कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ लाखांचे विमा कवच

CoronaVirus News :कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ लाखांचे विमा कवच

Next

मुंबई : ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाºया सामाजिक संस्था, संघटनांच्या कर्मचा-यांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार (उदा. दहन, दफन) करणाºया व्यक्ती आपल्या व कुटुंबीयांच्या काळजीने अंत्यसंस्कार विधी करण्यास घाबरतात. अशा वेळी शासकीय सेवेत नसलेले, परंतु या संकटाच्या काळामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून काही सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून हा पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत.
या कर्मचाºयांनाही त्यातून कोरोना संसर्गाचा धोका असून त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील या धाडसी कोरोना योद्ध्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती पाहून हा कालावधी वाढविला जाईल. कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल.
संबंधित सामाजिक संस्था, संघटना यांच्या कर्मचाºयांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबधित कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण दिले जाईल.

Web Title: Insurance cover of Rs 25 lakh for cremated corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.