शीना बोराला काश्मीरमध्ये पाहणारी महिला अधिकारी देणार जबाब; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 09:50 AM2021-12-23T09:50:58+5:302021-12-23T09:52:05+5:30

राज्यात गाजलेल्या हत्याकांडापैकी एक असलेल्या शीना बोरा हत्याकांडात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याच्या केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती.

indrani mukherjee lawyer claims sheena bora will be seen in kashmir | शीना बोराला काश्मीरमध्ये पाहणारी महिला अधिकारी देणार जबाब; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावा

शीना बोराला काश्मीरमध्ये पाहणारी महिला अधिकारी देणार जबाब; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गाजलेल्या हत्याकांडापैकी एक असलेल्या शीना बोरा हत्याकांडात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याच्या केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. आता शीनाला काश्मीरमध्ये पाहणारी ही महिला अधिकारी याबाबत सीबीआयला जबाब देण्यास तयार असल्याचेही मुखर्जी यांची वकील सना खान यांनी सांगितले आहे. तसेच सीबीआयकडे याबाबत सखोल तपास करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ पासून इंद्राणी भायखळा कारागृहात आहे. गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता. जामिनासाठी ती सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. एकीकडे इंद्राणी वेळोवेळी आपला जबाब बदलत असताना,  गेल्या आठवड्यात १६ डिसेंबर रोजी इंद्राणीने केलेल्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांनी सीबीआयला पत्र लिहून दिलेल्या माहितीत ‘काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिला अधिकारीकडून शीना बोरा जिवंत असून, ती काश्मीरमध्ये असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या महिलेने शीनासोबत भेट झाल्याचेही नमूद केले होते. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
 

Web Title: indrani mukherjee lawyer claims sheena bora will be seen in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.