'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:57 PM2024-01-30T17:57:34+5:302024-01-30T18:00:28+5:30

वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीत समावेशच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

'Inclusion of Disadvantaged Bahujan Aghadis in Mahavikas Aghadis' Nana Patole tweeted the information | 'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती

'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती

मुंबई- वंचित बहुजन आघाडीच्यामहाविकास आघाडीत समावेशच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला. याबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. 

नाना पटोले यांनी एक पत्र ट्विट केले आहे. या पत्रात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश केल्याचे सांगितले आहे. तसेच ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे २ फेब्रुवारी रोजी  महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचितमुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असंही म्हटले आहे. 

'आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र'; वडेट्टीवार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात

पत्रात काय म्हटलंय?

देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच.

आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे, असं या पत्रात म्हटले आहे. 

Web Title: 'Inclusion of Disadvantaged Bahujan Aghadis in Mahavikas Aghadis' Nana Patole tweeted the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.