सुधारित बातमी....े कॉलेज तरुणाला बेदम मारहाण

By Admin | Updated: September 20, 2014 23:30 IST2014-09-20T23:30:31+5:302014-09-20T23:30:31+5:30

सुधारित बातमी....

Improved news .... the college youth suffocated | सुधारित बातमी....े कॉलेज तरुणाला बेदम मारहाण

सुधारित बातमी....े कॉलेज तरुणाला बेदम मारहाण

धारित बातमी....

घाटकोपरमध्ये कॉलेज तरुणाला बेदम मारहाण
मुंबई: भररस्त्यात कॉलेज तरुणाला अडाव घालत त्याच्याकडून पैशांंची मागणी करत त्याला व त्याच्या बचावासाठी पुढे आलेल्या मित्रांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये सनी कुर्‍हाडे या तक्रारदार तरुणांसह रोहित बोर्‍हाडे, वैभव घाडी आणि संजय सावंत हे तिघे जण जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुपारच्या सुमारास घाटकोपर जागृतीनगर मेट्रोखालून सनी कुर्‍हाडे कॉलेजला जात असताना आरोपी शुभम संतोष जुवटकर (१८), जिगर दाम्हणे, विरेश आंग्रे आणि अक्षय मोरे या तरुणांनी त्याला अडाव घातला. आणि त्याच्याक डे पैशांची मागणी केली, मात्र पैसे देण्यास नकार देताच जुवटकर टोळीने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार मित्रांंच्या लक्षात येताच त्यांनी बचावासाठी पुढाकार घेतला. मात्र तेथून जुवटकर टोळीने पळ काढला आणि काही वेळातच हातात चॉपर, स्टम्प, आणि लाकडी हत्यारे घेवून या टोळीने कुर्‍हाडेंच्या मित्रांवर वार केले. नागरिक जमताहेत हे पाहून घटनास्थळाहून त्यांनी पळ काढला. तिघाही जखमी तरुणांना त्वरितच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी शुभम जुवटकर आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.
जुवटकर अभिलेखावरील आरोपी
शुभम जुवटकर हा अभिलेखावरील आरोपी असून याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Improved news .... the college youth suffocated