'I do not play like double' ... Udayanraje's second reaction after the Election result | 'रडीचा डाव मी खेळत नाही'... निकालानंतर उदयनराजेंची आक्रमक प्रतिक्रिया
'रडीचा डाव मी खेळत नाही'... निकालानंतर उदयनराजेंची आक्रमक प्रतिक्रिया

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या 80व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.

राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा 87,717 मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना 636620 एवढी मतं मिळाली असून, भाजपाच्या उदयनराजेंना 548903 एवढं मताधिक्य मिळालं आहे. शरद पवारांनी या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली होती. मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला ही घोषणा यशस्वी ठरल्याचं सांगत पवारांनी सातारकरांचे आभार मानले. आता, उदयनराजेंनीही पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलोही नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते. त्यानंतर, उदयनराजेंनी दुसऱ्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 

उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन मी रडीचा डाव खेळत नाही, असे म्हटले आहे. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले पण, लोकसेवा काय केली हेही लोकांनी पाहिले पाहिजे, असे उदयनराजेंनी म्हटले. तसेच, यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार असून खचणार नाही, असे उदनयराजे भोसलेंनी ट्विटर अकाऊंवटरुन म्हटलंय.


 

Web Title: 'I do not play like double' ... Udayanraje's second reaction after the Election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.