२०१९ मध्ये लाखाेंच्या मताधिक्याने किती उमेदवार जिंकले होते?; घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:42 AM2024-04-10T06:42:50+5:302024-04-10T06:43:20+5:30

राज्यात पक्षाने विजयाचे मताधिक्य मिळविताना सरासरी १.८ लाख अधिक मते मिळविली होती. 

How many candidates won in 2019 with a margin of lakhs of votes? | २०१९ मध्ये लाखाेंच्या मताधिक्याने किती उमेदवार जिंकले होते?; घ्या जाणून

२०१९ मध्ये लाखाेंच्या मताधिक्याने किती उमेदवार जिंकले होते?; घ्या जाणून

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ पैकी ४३ जागा १ लाखाहून अधिक मतांच्या फरकाने जिंकल्या, त्यापैकी १८ जागा महाराष्ट्रातून जिंकल्या होत्या. राज्यात पक्षाने विजयाचे मताधिक्य मिळविताना सरासरी १.८ लाख अधिक मते मिळविली होती. 

महाराष्ट्रात सर्वाधिक मार्जिन कुणाला? 
४ उमेदवारांनी ४ लाखांपेक्षा अधिक मते मिळविली होती. मुंबई उत्तरचे भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी सर्वाधिक ३.६ लाख मते मिळविली होती. उद्धवसेनेच्या राजन विचारे यांना ठाण्यात ४.१ लाखांहून अधिक मते मिळाली होती. तर जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील यांनीही ४.१ लाखांहून अधिक मते मिळविली होती.

३ लाखांपेक्षा अंतर
३ उमेदवारांना ३ लाखांहून अधिक मते मिळाली होती. शिंदेसेनेने  कल्याणमध्ये तर भाजपने रावेर, जालना आणि पुण्यात ३ लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर १ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने केवळ शरद पवार गटाने बारामतीत आणि सातारा येथे विजय मिळविला होता.

राज्य कमाल मताधिक्य किमान मताधिक्य सरासरी (लाखमध्ये) 
हिमाचल    ४
नवी दिल्ली    ३.९
हरयाणा    ३.६
राजस्थान    ३.४
गुजरात    ३.४
मध्य प्रदेश    ३.०
उत्तराखंड    २.९
तामिळनाडू    २.५
झारखंड    २.५
बिहार    २.२
महाराष्ट्र    १.८
आसाम    १.८
कर्नाटक    १.७
उत्तर प्रदेश    १.६
पश्चिम बंगाल    १.४
छत्तीसगड    १.३
जम्मू काश्मीर    १.३
आंध्र प्रदेश    १.२    
केरळ    १.२
तेलंगणा    १.२
पंजाब    ०.९
ओडिशा    ०.८

Web Title: How many candidates won in 2019 with a margin of lakhs of votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.