Hatkanangale Lok Sabha : महायुतीत हातकणंगलेचा तिढा वाढणार; मतदारसंघाची सदाभाऊ खोतांनी फडणवीसांकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:59 PM2024-03-28T16:59:58+5:302024-03-28T17:03:27+5:30

Hatkanangale Lok Sabha Election : आज माध्यमांसोबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यामुळे आता हातकणंगलेचा महायुतीमध्ये तिढा वाढणार अशी चर्चा सुरू आहे. 

Hatkanangale Lok Sabha Election 2024 Complications will increase in the mahayuti will increase Sadabhau Khot demanded the constituency from Fadnavis | Hatkanangale Lok Sabha : महायुतीत हातकणंगलेचा तिढा वाढणार; मतदारसंघाची सदाभाऊ खोतांनी फडणवीसांकडे केली मागणी

Hatkanangale Lok Sabha : महायुतीत हातकणंगलेचा तिढा वाढणार; मतदारसंघाची सदाभाऊ खोतांनी फडणवीसांकडे केली मागणी

Hatkanangale Lok Sabha Election : महायुतीने अजूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आहे, या जागेवर आता धैर्यशील माने खासदार आहेत. येत्या दोन दिवसात ही जागा जाहीर होऊ शकते असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी या जागेची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, त्यामुळे आता हातकणंगलेचा महायुतीमध्ये तिढा वाढणार अशी चर्चा सुरू आहे. 

Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

आज माध्यमांसोबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना २०१४ पासून भाजपासोबत आहे. आम्ही २०१९ ला हातकणंगलेकडे मागणी केली होती. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यावेळी आम्ही तिथे प्रामाणिक काम केले. सध्या त्या मतदारसंघात आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे, तो मतदारसंघ चळवळीचा आहे, यासाठी आम्ही या मतदारसंघाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हीच मागणी त्यांच्याकडे करणार आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले. 

'मला शेतकऱ्यांच्या कामसाठी लढायचं आहे'

सदाभाऊ खोत म्हणाले, मला कोणाचाही पराभव करणाऱ्यासाठी लढायचं नाही. मला शेतकऱ्यांच्या कामसाठी लढायचं आहे. १० वर्षे ते खासदार होते तेव्हा ते  शेतकऱ्यांसाठी सभागृहात बोलू शकले नाहीत, तिथल्या शेतकऱ्यांना बदल हवा आहे त्यामुळे राजू शेट्टी यांचं आव्हान माझ्यासाठी क्षुल्लक आहे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. मी राजकारणात अपघाताने आलो आहे, माझा सन्मान देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केला आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.  

Web Title: Hatkanangale Lok Sabha Election 2024 Complications will increase in the mahayuti will increase Sadabhau Khot demanded the constituency from Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.