हा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान, नामांतरावरुन मोदींवर निशाणा

By महेश गलांडे | Published: February 24, 2021 02:23 PM2021-02-24T14:23:18+5:302021-02-24T14:27:21+5:30

सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपाकडून हा सरदार पटेल यांचा अवमान आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेद्र मोदी स्टेडियम असे ठेवणे म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान आहे,

This is a great insult to Sardar Vallabhbhai Patel, congress on narendra modi after rename of motera stedium | हा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान, नामांतरावरुन मोदींवर निशाणा

हा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान, नामांतरावरुन मोदींवर निशाणा

Next
ठळक मुद्देसरदार वल्लभाई पटेल यांच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपाकडून हा सरदार पटेल यांचा अवमान आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेद्र मोदी स्टेडियम असे ठेवणे म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान आहे,

मुंबई - गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. (India vs England 3rd Test Live Score ) दरम्यान, यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केलीय. 

सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपाकडून हा सरदार पटेल यांचा अवमान आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेद्र मोदी स्टेडियम असे ठेवणे म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान आहे, हे लज्जास्पद आहे, असे ट्विट मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि देवासचे आमदार  सज्जनसिंह वर्मा यांनी केलंय. वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला आक्षेप घेतला आहे. 

दिल्लीतील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मुकेश शर्मा यांनीही ट्विटरवरु मोदींच्या नावाला आक्षेप घेत, सरदार वल्लभाई पटेल यांचा बदला घेण्याचं काम भाजपाने केल्याचं म्हटलंय.  

गुजरात युवक काँग्रेसनेही स्टेडियमच्या नामांतराला विरोध दर्शवला असून लोहपुरुष सरदार पटेल यांना मोदींनी विनम्र अभिवादन केलंय. मोदींनी सरदार पटेल यांच्या स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवलंय, जय हो... असे ट्विट युवक काँग्रेसन केलंय. 

जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. 

स्टेडियमचं वैशिष्ट

हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा भाग आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. शिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत. मोटेरा स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम सध्या बीसीसीआय सचिव असलेले जय शाह हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना सुरू झाले. या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक सहज बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. 

दरम्यान, मेलबोर्न क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. जीसीए स्टेडियममध्ये होणाऱ्या पुढील दोन सामन्यांसाठी जवळपास ५५ हजार तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. 
 

Web Title: This is a great insult to Sardar Vallabhbhai Patel, congress on narendra modi after rename of motera stedium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.