बकरी ईदची नमाज मशीद अन् ईदगाहमध्ये पडण्यास बंदी - गृह मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 06:50 PM2020-07-18T18:50:41+5:302020-07-18T18:55:05+5:30

गृह विभागाने कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर   मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Goat Eid Namaz Mosque, ban on Eidgah - Ministry of Home Affairs | बकरी ईदची नमाज मशीद अन् ईदगाहमध्ये पडण्यास बंदी - गृह मंत्रालय

बकरी ईदची नमाज मशीद अन् ईदगाहमध्ये पडण्यास बंदी - गृह मंत्रालय

googlenewsNext
ठळक मुद्देगृह विभागाने कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर   मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज  नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी

मुंबई : कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईदची (ईद उल अजहा) नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी., अशी मार्गदर्शक  सूचना  गृह विभागाने जारी केली आहे. मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे  आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. 

गृह विभागाने कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर   मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज  नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी., प्रतिबंधित  क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी  गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  

Web Title: Goat Eid Namaz Mosque, ban on Eidgah - Ministry of Home Affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.