महिला कुस्तीपटूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:25 IST2023-06-01T08:25:15+5:302023-06-01T08:25:40+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे.

महिला कुस्तीपटूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
मुंबई : लैंगिक छळवणूक प्रकरणी खा. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटू या दिल्लीत आंदोलन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून केली आहे.
राज यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण प्रधानसेवक आहात, या नात्याने या विषयाकडे लक्ष द्यावे. आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईत कोणाच्याही बाहुबलाचे दडपण किंवा अडथळा येणार नाही, इतकीच खात्री त्यांना सरकारकडून, म्हणजेच आपल्याकडून हवी आहे. जर त्यांना न्याय मिळाला नाही तर कुठल्या खेळाडूला रक्ताचे पाणी करून देशासाठी पदक मिळवावे, असे वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दु:खाची पर्वा नाही, असे चित्र उभे राहिले तर खेलो इंडिया हे स्वप्नच राहील.