एअर इंडियाच्या विमानात सेक्ससाठी महिला प्रवाशावर जबरदस्ती

By Admin | Updated: January 7, 2017 11:23 IST2017-01-07T11:09:57+5:302017-01-07T11:23:34+5:30

एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमधील एका प्रवाशाने इकोनॉमी क्लासमधील महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

Forcing women entrepreneurs to air sex in Air India | एअर इंडियाच्या विमानात सेक्ससाठी महिला प्रवाशावर जबरदस्ती

एअर इंडियाच्या विमानात सेक्ससाठी महिला प्रवाशावर जबरदस्ती

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 7 - मुंबईहून नेवार्कला जाणा-या एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमधील एका प्रवाशाने इकोनॉमी क्लासमधील महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. 21 डिसेंबरच्या रात्री एअर इंडियाच्या 191 विमानाने मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. 
 
आरोपी प्रवाशाकडे बिझनेस क्लासचे तिकिट होते. उड्डाणानंतर काही वेळाने हा प्रवासी आपल्या जागेवरुन उठला व इकोनॉमी क्लासमधील महिलेच्या शेजारी रिकाम्या आसानावर जाऊन बसला. महिलेचा डोळा लागल्यानंतर आरोपीने महिलेच्या शरीरावरुन हात फिरवण्यास सुरुवात केली. छातीवर होत असलेल्या पुरुषी स्पर्शाने महिलेला जाग आली. आपला विनयभंग होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने आरडाओरडा सुरु केला. 
 
लगचेच केबिन क्रू चे सदस्य तिथे आले. विमान अमेरिकेमध्ये लँड होताच एअर इंडिया आणि महिलेने आरोपी प्रवाशाविरोधात तक्रार नोंदवली व आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. महिला अमेरिकेत तक्रार नोंदवणार असल्याचे समजताच त्याने गयावया सुरु केली. आपल्याला एकदा महिलेला भेटू द्या असे आरोपी केबिन क्रू ला सांगत होता. आपण अनावधानाने महिलेला स्पर्श केला. त्यावेळी मी सुद्धा झोपेत होतो असे त्या प्रवाशाचे म्हणणे होते. पण महिलेने त्याला भेटण्यास नकार दिला व विमानातून उतरताच रितसर तक्रार दाखल केली. 
 

Web Title: Forcing women entrepreneurs to air sex in Air India