मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:11 IST2020-12-05T04:11:00+5:302020-12-05T04:11:00+5:30

मुंबई : अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष व मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७२ ...

Fishermen leader Damodar Tandel dies | मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल यांचे निधन

मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल यांचे निधन

मुंबई : अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष व मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना व दोन नातवंडे असा परिवार आहे.

कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००२ साली ते महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे राष्ट्रवादीमधून उपाध्यक्ष झाले होते. मच्छीमारांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार हाेऊन मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

...................

Web Title: Fishermen leader Damodar Tandel dies