अखेर कॅम्पा कोलातील अंधार दूर होणार

By Admin | Updated: March 12, 2015 01:15 IST2015-03-12T01:15:07+5:302015-03-12T01:15:07+5:30

वरळी येथील कॅम्पा कोला कंपाउंडमधील बेकायदा मजले अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ त्यामुळे या मजल्यांचा वीजपुरवठा

Finally, the darkness in Campa Cola will be overcome | अखेर कॅम्पा कोलातील अंधार दूर होणार

अखेर कॅम्पा कोलातील अंधार दूर होणार

मुंबई : वरळी येथील कॅम्पा कोला कंपाउंडमधील बेकायदा मजले अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ त्यामुळे या
मजल्यांचा वीजपुरवठा
पूर्ववत करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली़ त्यानुसार पालिका आयुक्तांशी चर्चा करून लवकरच कॅम्पा कोलामध्ये वीजपुरवठा सुरू करण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने दाखविली आहे़
कॅम्पा कोलातील बेकायदा मजल्यांचा वीज आणि पाणीपुरवठा पालिकेने गेल्या वर्षी खंडित केला़ मात्र सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पा कोलावासीयांना दिलासा दिला आहे़ परीक्षेचे दिवस असल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून या मजल्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली़
अंतिम सुनावणीत न्यायालयातील निर्णय त्यांच्याविरोधात गेल्यास वीजपुरवठा पुन्हा खंडित करण्यात येईल, अशी हमी त्यांच्याकडून लिहून घेण्याची सूचनाही सदस्यांनी केली़ त्यानुसार आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करून
तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा देण्यात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Finally, the darkness in Campa Cola will be overcome