चांदिप येथे भीषण अपघात

By Admin | Updated: June 20, 2015 23:16 IST2015-06-20T23:16:10+5:302015-06-20T23:16:10+5:30

शिरसाड अंबाडी मार्गावरील चांदिप गावाजवळ गावदेवी मंदिरासमोर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर झाडाला धडकल्याने हा अपघात झाला.

Fatal accidents at Chandip | चांदिप येथे भीषण अपघात

चांदिप येथे भीषण अपघात

पारोळ : शिरसाड अंबाडी मार्गावरील चांदिप गावाजवळ गावदेवी मंदिरासमोर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक, गाडीचा मालक आणि प्रवासी हे तिघे गंभीर जखमी झाले.
पहाटे तीनच्या सुमारास वाडा येथील कंपनीतून लांब सळ्यांनी भरलेला ट्रेलर चांदीप येथे आल्यावर जोरदार पावसामुळे चालकाला मार्गाचा अंदाज न आल्याने वडाचा झाडाला जोरदार धडक दिली. ट्रेलर झाडात घुसल्याने जखमी अडकून पडले.
गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर पण त्या जखमींना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमक दलाच्या जवानांना बोलवण्यात आले. त्यांनी दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नाने जखमींना बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी चालकाला आपला पाय गमवावा लागला. या अपघाताची भीषणता पाहता हे तीन जखमी वाचले कसे या बाबत नागरीक आश्चर्य व्यक्त करत होते. या घडलेला अपघाताची नोंद मांडवी पोलीसांत करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Fatal accidents at Chandip