बीएड करतानाचे प्रोत्साहन राजकारणात उपयोगी पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:42 AM2020-09-05T03:42:13+5:302020-09-05T03:42:54+5:30

कोरोनामुळे या वर्षी शिक्षक दिन आॅनलाइन साजरा होणार आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरत असते. त्यामुळेच ध्येय गाठणे शक्य होते. शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या वर्षा गायकवाड यांचे हे अनुभव.

Encouragement while doing BEd proved useful in politics | बीएड करतानाचे प्रोत्साहन राजकारणात उपयोगी पडले

बीएड करतानाचे प्रोत्साहन राजकारणात उपयोगी पडले

Next

- गौरीशंकर घाळे
मुंबई : कोरोनामुळे या वर्षी शिक्षक दिन आॅनलाइन साजरा होणार आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरत असते. त्यामुळेच ध्येय गाठणे शक्य होते. शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या वर्षा गायकवाड यांचे हे अनुभव.

मिश्रा सरांनी चालत राहायला शिकवले
अनेकदा आपण थकतो, स्वत:बद्दलच शंका येते. हे करू शकू की नाही, असा संभ्रम निर्माण होतो. अशावेळी शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन खूप महत्त्वाचे ठरते. बीएड करत असताना, असाच प्रसंग आला. सोडून द्यायचा विचार प्रबळ होता. त्या वेळी आमच्या मिश्रा सरांनी प्रोत्साहन दिले. खडतर प्रसंगात खचून न जाता चिकाटीने मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरित केले.

आमदार म्हणून वर्षा गायकवाड यांनी जनसेवेची अनेक कामे केली आहेत. तसेच मंत्री पद साभाळत असताना विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम त्या करत आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी जबाबदारीने निर्णय घेतले.

तेंव्हाचा सराव आता उपयोगी पडतोय
आज राजकीय जीवनात वावरताना ज्या बाबी महत्त्वाच्या ठरताहेत त्याची मुळे शिक्षकांच्या शिकवणीत आहेत. प्राध्यापक बनत असताना सभाधीटपणा, बोलण्याचा सराव, आपले विचार स्पष्ट आणि परिणामकारकपणे मांडण्याचा जो काही सराव शिक्षकांमुळे झाला त्याचा आज उपयोग होतो आहे.
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत सराव करताना व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. एखाद्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याला घडवत असतात. विद्याार्थ्याच्या आयुष्याला आकार देत असतात. त्याने आदर्श समाज घडत असतो.

महत्त्वाकांक्षा आणि दूरदृष्टी दिली
शिक्षकांच्या परिसस्पर्शाने विद्यार्थी घडतो. समाजजीवनाच्या विविध अंगांना समृद्ध करणारे नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात. कधी ते शिकवतात, कधी सांगतात, महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टी देण्याचे काम शिक्षक करतात. यामुळे त्यांचे मार्गदर्शन हे प्रत्येक विद्यार्थ्याला नेहमीच उपयोगी पडत असते. शाळेतील अनुभव आयुष्यातील खडतर प्रवासात उपयोगी पडतो. शिक्षकांचे मार्गदर्शन दिशा देत असते.

आमचे यंदा ‘थँकस् अ टिचर’
सरकारने शिक्षक दिनानिमित्त यंदाच्या वर्षी ‘थँकस् अ टिचर’ असा अभिनव उपक्रम चालवला आहे. त्यामध्ये विद्यार्थी, पालक, किंवा कोणाही नागरिकाने आपल्या शिक्षकाबद्दलच्या आठवणी, प्रेरणादायक प्रसंग, एखादी घटना ज्याने आयुष्याला कलाटणी मिळाली किंवा दिशा गवसली, तो प्रसंग सोशल मीडियावर टाकावा.

Web Title: Encouragement while doing BEd proved useful in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.