मुंबईत ईडीची छापेमारी, पत्रा चाळप्रकरणी २ ठिकाणी तर हेराल्ड हाऊसची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:14 IST2022-08-02T14:13:47+5:302022-08-02T14:14:56+5:30
ED Raid : नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसची झाडाझडती सुरु आहे.

मुंबईत ईडीची छापेमारी, पत्रा चाळप्रकरणी २ ठिकाणी तर हेराल्ड हाऊसची झाडाझडती
मुंबई : ईडीने पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांची मुंबईत तीन ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. यात 2 ठिकाणी पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या प्रकरणात छापे टाकण्यात आले आहेत. तसेच नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसची झाडाझडती सुरु आहे.
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. घोटाळ्यातील काही रक्कम संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांनी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा ईडीने आरोप केला आहे. एप्रिल महिन्यात ईडीने वर्षा राऊत व त्यांच्या दोन सहकाऱ्यांची सव्वाअकरा कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. वास्तविक, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊत यांना आठ दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, याआधी प्रवीण राऊतप्रकरणी सर्व कागदपत्रे हाती असताना संजय राऊत यांची आठ दिवस कोठडी कशाला? असा प्रश्न करत न्यायालयाने राऊत यांना केवळ चारच दिवसांची ईडी कोठडी सुनावली.