नाटय़संमेलन अध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

By Admin | Updated: October 2, 2014 01:09 IST2014-10-02T01:09:18+5:302014-10-02T01:09:18+5:30

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे आयोजित 95व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनासाठी दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Drona contest for president of the Games | नाटय़संमेलन अध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

नाटय़संमेलन अध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

 मुंबई : अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे आयोजित 95व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनासाठी दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ अभिनेत्नी फैयाज शेख आणि मुरलीधर खैरनार या दोघांत अध्यक्षपदासाठी चुरस रंगेल. या पदासाठी नाटय़ परिषदेतर्फे मागवलेल्या नावांच्या अखेरच्या दिवशी फैयाज व खैरनार या दोघांची नावे परिषदेकडे आली आहेत. 
नावे सुचिवण्याच्या अंतिम दिवसार्पयत नाटय़ परिषदेकडे  मुंबईतून फैयाज शेख व नाशिकहून मुरलीधर खैरनार या दोघांची नावे आली असली, तरी या नावांवर परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ नये, याकडे परिषदेचा कल आहे. त्यामुळे नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत यांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाटय़संमेलन जानेवारी 2क्15 मध्ये होणार असून, संमेलन स्थळ अजून निश्चित झालेले नाही. परंतु हे नाटय़ संमेलन बेळगावात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Drona contest for president of the Games