डॉ. आनंदीबार्इंच्या पुतळ्याला सापडला मुहूर्त!

By Admin | Updated: November 24, 2015 01:51 IST2015-11-24T01:51:09+5:302015-11-24T01:51:09+5:30

शहराला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारल्या जाणाऱ्या अर्ध पुतळ्याला अखेर मुहूर्त सापडला आहे

Dr. Muhurat found in the statue of a happy family! | डॉ. आनंदीबार्इंच्या पुतळ्याला सापडला मुहूर्त!

डॉ. आनंदीबार्इंच्या पुतळ्याला सापडला मुहूर्त!

कल्याण : शहराला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारल्या जाणाऱ्या अर्ध पुतळ्याला अखेर मुहूर्त सापडला आहे. याबाबतच्या निविदेला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी हिरवा कंदील दाखविला. यानुसार, महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात आनंदीबार्इंचा अर्धपुतळा बसविला जाणार आहे.
त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने महापालिका शिक्षण मंडळ सदस्य अनिल काकडे यांनी डॉ. जोशींचा अर्धपुतळा बसविण्याची मागणी केली. २००५ मध्ये महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या महासभेत डॉ. जोशी यांचा रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात पुतळा उभारण्यात यावा, असा प्रशासनाने आणलेला ठराव एकमताने मंजूर झाला होता. याबाबत, २००७ मध्ये निविदा काढल्या. परंतु, कार्यवाही पुढे सरकली नाही. स्मारक उभारण्यासंदर्भात मनपाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ दोन वेळा काकडे यांनी लाक्षणिक उपोषण छेडले होते. तर, मार्च २०१५ मध्ये पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर, स्मारकासाठी विशेष निधीची तरतूद महापालिकेने अंदाजपत्रकात केली.

Web Title: Dr. Muhurat found in the statue of a happy family!