BKCमध्ये डबल डेकर बस झाडाला धडकली, ६ जखमी

By Admin | Updated: November 16, 2016 15:17 IST2016-11-16T14:16:48+5:302016-11-16T15:17:00+5:30

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एका डबल डेकर बसला अपघात झाला. कोणतीही जीवितहानी नाही

A double decker bus hit a tree in BKC, 6 injured | BKCमध्ये डबल डेकर बस झाडाला धडकली, ६ जखमी

BKCमध्ये डबल डेकर बस झाडाला धडकली, ६ जखमी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एका डबल डेकर बसला अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 310 क्रमांकाची ही डबल डेकर बस वांद्रे रेल्वे स्थानकावरुन कुर्ल्याच्या दिशेन जात होती. यावेळी परिसरातील एका झाडाला या बसची धडक बसली. सीटी पार्कजवळची ही घटना आहे. 
 
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र 6 जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जखमींमध्ये काही शाळकरी मुलांचादेखील समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  तसेच अपघातात बसच्या वरच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. 
 
घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला? याचा तपास करत आहेत.   
 
 
 
 

Web Title: A double decker bus hit a tree in BKC, 6 injured