Donald Trump India Visit: NCP leader Jitendra Awhad has criticized US President Donald Trump | Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी अहमदाबाद येथे सकाळी दाखल झाले. भारतात दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंबीयांसह महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. मात्र साबरमती आश्रमाच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महात्मा गांधींचा साधा उल्लेखदेखील न केल्याने मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. परंतु आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो, त्या महात्मा गांधीजींचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत मी ट्रम्प यांचा निषेध करतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.


14 तासांचा प्रवास करून डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाले. यानंतर विमानतळावरून थेट महात्मा गांधींच्या आश्रमाला ट्रम्प यांनी भेट दिली. मोदींनी महात्मा गांधींच्या आश्रमातील विविध वस्तू आणि आश्रमाची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर साबरमती आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संदेश लिहून नरेंद्र मोदींचे आभार मानले. ''टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी... थँक्यू फॉर दिस वंडरफुल्ल व्हिसिट'' असा मेसेज ट्रम्प यांनी लिहिला आहे. मात्र, या अभिप्राय पुस्तकावर ट्रम्प यांनी महात्मा गांधींबद्दल कोणताच उल्लेख न केल्यामुळे विरोधकांकडून आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करतात तेव्हा...

सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे; ट्रम्प यांची 'मोटेरा'वर 'बॅटिंग'

मोटेरामध्ये PM मोदींनी 21 मिनिटांच्या भाषणात 22 वेळा घेतलं ट्रम्प यांचं नाव

 ताजमहाल भारताच्या संस्कृती आणि सुंदरतेचं प्रतिक- डोनाल्ड ट्रम्प

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Donald Trump India Visit: NCP leader Jitendra Awhad has criticized US President Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.