इलेक्ट्रिक बाईक्स,रिक्षा, डिलिव्हरी बाईक्ससह विविध साहित्याचे वाटप; अनंत सेवा फाऊंडेशनकडून कष्टकरी कुटुंबांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:54 IST2026-04-15T20:50:38+5:302026-04-15T20:54:35+5:30

कष्टकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांना उदरनिर्वाहाची कायमची साधने मिळावीत, यासाठी अनंत सेवा फाऊंडेशनतर्फे महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध गोष्टींचे वाटप केले जाणार आहे. 

Distribution of various materials including electric bikes, rickshaws, delivery bikes; Support to hardworking families from Anant Seva Foundation | इलेक्ट्रिक बाईक्स,रिक्षा, डिलिव्हरी बाईक्ससह विविध साहित्याचे वाटप; अनंत सेवा फाऊंडेशनकडून कष्टकरी कुटुंबांना आधार

इलेक्ट्रिक बाईक्स,रिक्षा, डिलिव्हरी बाईक्ससह विविध साहित्याचे वाटप; अनंत सेवा फाऊंडेशनकडून कष्टकरी कुटुंबांना आधार

मुंबई: ऊन पावसाची तमा न बाळगता राबणाऱ्यांसाठी अनंत सेवा फाऊंडेशनतर्फे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कष्टकरी कुटुंबांना त्यांच्या उपजिविकेसाठी साधने उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या विकासात वाटा उचलण्याच्या दृष्टीने अनंत फाऊडेशनने एक पाऊल टाकले आहे. अनंत सेवा फाऊंडेशनतर्फे १६ एप्रिल रोजी 'भव्य वाटप मोहिमेचे' आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५:०० वाजल्यापासून खार जिमखाना मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या सामाजिक उपक्रमात 'आय लव्ह मुंबई फाऊंडेशन' आणि 'अनंत युवा प्रतिष्ठान' यांनीही योगदान दिले आहे. 

या कार्यक्रमात ३,००० सायकली, २०० इलेक्ट्रिक बाईक्स, डबेवाल्यांसाठी १०० ईव्ही (EV) डिलिव्हरी बाईक्स, ५० ईव्ही लोडर्स, ४० रिक्षा आणि २,००० शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. 

कष्टकरी व्यक्ती आणि कुटुंबांना कायमचे उपजीविकेची साधने उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनवणे, हा या उपक्रम राबवण्याचा मागचा मुख्य उद्देश आहे.

माथेरानमध्ये ६५० घोड्यांचे लसीकरण

अनंत अंबानी यांच्या मानवतावादी दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन फाऊंडेशनने फक्त शहरातील व्यक्तींच्या विकासापुरते मर्यादित न राहता आपल्या सेवाकार्याचा विस्तार केला आहे. माथेरानमध्ये संस्थेने ६५० घोड्यांचे लसीकरण आणि जंतनिर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या अश्वांच्या दीर्घकालीन संगोपनासाठी आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी लवकरच एक नवीन तबेला उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

देशातील १०० मंदिरांचा जीर्णोद्धार

अनंत सेवा फाऊंडेशनने आपली सांस्कृतिक बांधिलकीचेही भान जपले आहे. फाऊंडेशनने भारतातील १०० जीर्ण मंदिरांच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातील दापोली येथील ४० वर्षे जुन्या विठ्ठल मंदिराच्या नूतनीकरणाने करण्यात आली आहे.

समाज आणि देशाच्या विकासात मोलाचे ठरणारे हे उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न फाऊंडेशनचा आहे. यातून समाजातील वेगवेगळ्या घटकांना सक्षम करणे आणि पारंपरिक वारसा जतन केला जाईल आणि मानवतेची सेवा अधिक निष्ठेने केली जाईल, अशा पद्धतीने फाऊंडेशनने उपक्रम हाती घेतले आहेत. 
 

Web Title : अनंत सेवा फाउंडेशन ने जरूरतमंद परिवारों को बाइक, रिक्शा वितरित किए

Web Summary : अनंत सेवा फाउंडेशन ने वंचित परिवारों का समर्थन करने के लिए इलेक्ट्रिक बाइक, रिक्शा, सिलाई मशीनें वितरित कीं। उन्होंने माथेरान में घोड़े के टीकाकरण और मंदिर जीर्णोद्धार परियोजनाओं की भी शुरुआत की, जो सामाजिक और सांस्कृतिक कल्याण के प्रति प्रतिबद्धता दर्शाती है।

Web Title : Anant Seva Foundation Distributes Bikes, Rickshaws, Supporting Needy Families

Web Summary : Anant Seva Foundation distributes electric bikes, rickshaws, sewing machines to support underprivileged families. They also initiated horse vaccination in Matheran and temple restoration projects, demonstrating commitment to social and cultural welfare.

टॅग्स :Mumbaiमुंबई