शिर्डीला जाणाऱ्या पायी दिंडीला कारने चिरडले; तीन ठार, 19 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 22:02 IST2018-12-22T22:02:17+5:302018-12-22T22:02:37+5:30

साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने जोरदार धडक देत साईभक्तांना चिरडले.

Dindi gets hit by the car going to Shirdi; Three killed, 19 seriously | शिर्डीला जाणाऱ्या पायी दिंडीला कारने चिरडले; तीन ठार, 19 गंभीर

शिर्डीला जाणाऱ्या पायी दिंडीला कारने चिरडले; तीन ठार, 19 गंभीर

सिन्नर (नाशिक): सिन्नर- शिर्डी रस्त्यावर शिर्डीला पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरूंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. 


15 फूट उंच साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने जोरदार धडक देत साईभक्तांना चिरडले. त्यात तीन साईभक्त ठार झाले असून 19 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून अविनाश अशोक पवार ( वय-30), अनिकेत दीपक मेहेत्रे (वय-18)अशी त्यांची नावे आहेत. 


सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिर्डीकडे साई नामाचा जप करीत चाललेल्या कांदवली समतानगर येथील पालखी देवपूर फाट्याच्यापुढे स्विफ्टकारने 15 फुटी देखावा असलेल्या रथाला जोरदार धडक दिली. त्यात तीन ठार झाले तर 19 साईभक्त गंभीर जखमी झाले आहे. अपघात होऊन अर्धातास झाल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहचले नसल्याने साईभक्तांनी संताप व्यक्त केला. काही जखमींना नाशिक येथे तर काहींना शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी साईभक्तांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
 

Web Title: Dindi gets hit by the car going to Shirdi; Three killed, 19 seriously