धारावी ‘एसटीपी’ जुलैपर्यंत सुरू करा, आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:54 IST2026-04-17T13:38:20+5:302026-04-17T13:54:11+5:30

मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र महत्त्वपूर्ण असून, जुलै २०२७ पर्यंत धारावीमधील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्या, असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Dharavi 'STP' to be started by July, orders Commissioner Ashwini Bhide | धारावी ‘एसटीपी’ जुलैपर्यंत सुरू करा, आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश

धारावी ‘एसटीपी’ जुलैपर्यंत सुरू करा, आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश

मुंबई -  मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र महत्त्वपूर्ण असून, जुलै २०२७ पर्यंत धारावीमधील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्या, असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. धारावी येथील ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये, म्हणून  पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. 

मुंबईत सध्या वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप, वर्सोवा अशा ७ ठिकाणी एसटीपी केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांतून दररोज सुमारे २,४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर तृतीयस्तरावरील प्रक्रिया करून ५० टक्के म्हणजे, १,२३२ दशलक्ष लिटर पाणी पिण्यायोग्य करण्यात येईल अशी पालिकेची योजना आहे.

चुनाभट्टीत पावसाचे पाणी साचणार नाही हे पाहा! 
चुनाभट्टी रेल्वेस्थानक परिसरात २०२४ मध्ये जलकोंडी झाली होती. २०२५ मध्ये पाणी साचू नये यासाठी पालिकेकडून काही उपाययोजना करण्यात आल्या.
त्यामुळे १९ ऑगस्ट २०२५ वगळता संपूर्ण पावसाळ्यात पाणी साचले नाही. या सर्व उपाययोजनांची पाहणी करून संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.  

सिक्वेन्सियल बॅचिंग रिॲक्टर तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प
हा प्रकल्प सिक्वेन्सियल बॅचिंग रिॲक्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. अत्यंत कमी जागेत एकापेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतीमध्ये प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. 
या प्रकल्प अंतर्गत प्रवेशित सांडपाणी उदंचन केंद्र, स्लज रूम,  सिक्वेन्सियल बॅचिंग रिऍक्टर प्रक्रियेसाठी उभारण्यात येणाऱ्या टाक्या,  तृतीयस्तरीय शुद्धीकरण प्रक्रियेची इमारत, गाळ प्रक्रिया टाकी, सांडपाणी घेवून येणाऱ्या बोगद्यास जोडलेला शाफ्ट आणि प्रक्रिया केलेले पाणी घेऊन जाणारा शाफ्ट या सर्व घटकांची पाहणी भिडे 
यांनी केली. 

६५टक्के प्रगती धारावी मलजल प्रक्रिया केंद्राची झाली आहे. जुलै २०२७ पर्यंत धारावीमधील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल,  या दृष्टीने कामे करा, असे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. 

‘नालेसफाईत गुणवत्तेसह पारदर्शकता हवी’ 
मान्सूनपूर्व नालेसफाईदरम्यान नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात गुणवत्ता व पारदर्शकता राहावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

Web Title : धारावी एसटीपी: आयुक्त भिडे ने जुलाई तक शुरू करने का आदेश दिया, प्रगति की समीक्षा की

Web Summary : आयुक्त भिडे ने अधिकारियों को निर्देश दिया कि वे सुनिश्चित करें कि धारावी का एसटीपी जुलाई 2027 तक चालू हो जाए। उन्होंने 418 एमएलडी संयंत्र और वर्षा जल निकासी की तैयारियों की समीक्षा की। मुंबई सात एसटीपी को उन्नत कर रहा है, जिसका लक्ष्य 2,464 एमएलडी पानी में से 50% को पीने योग्य बनाना है। भिडे ने मानसून से पहले नाला सफाई में गुणवत्ता और पारदर्शिता पर जोर दिया।

Web Title : Dharavi STP: Commissioner Bhide Orders July Launch, Reviews Progress

Web Summary : Commissioner Bhide directed officials to ensure Dharavi's STP is operational by July 2027. She reviewed the 418 MLD plant and rainwater drainage preparations. Mumbai is upgrading seven STPs, aiming to treat 50% of 2,464 MLD water for drinking. Bhide stressed quality and transparency in pre-monsoon drain cleaning.