आज रंगणार धमाल गल्ली

By Admin | Updated: June 7, 2015 00:26 IST2015-06-07T00:26:25+5:302015-06-07T00:26:25+5:30

लोकमत वृत्तसमूह आयोजित ‘धमाल गल्ली’ रविवारी पुन्हा एकदा नेरूळ पामबीचवर होणार आहे.

Dhamal lane to be played today | आज रंगणार धमाल गल्ली

आज रंगणार धमाल गल्ली

नवी मुंबई : लोकमत वृत्तसमूह आयोजित ‘धमाल गल्ली’ रविवारी पुन्हा एकदा नेरूळ पामबीचवर होणार आहे. रविवार, ७ जून रोजी पामबीच रोड वाझीरानी स्पोर्ट्स क्लबजवळील नेरूळ, सेक्टर १८ येथील रस्त्यावर सकाळी ६.३० ते १० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे, मैदानी खेळांचे आयोजन केले आहे.
मागील रविवारी पामबीचवरील धमाल गल्लीला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादानंतर नागरिकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे आयोजन आले आहे. या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर वाशी येथील श्री अरिहंत हेल्थकेअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आहे. यामध्ये झुम्ब्बा, एरोबिक्स, योगा, नृत्य आणि संगीत, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, चित्रकला, कराटे, टॅट्टू मेकिंग, स्केटिंग, सायकलिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वच वयोगटासाठी खुला असून, यामध्ये सहभागी होण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या कार्यक्रमात रस्त्यावरील ट्राफीक काही काळ बंद करून धमाल मस्तीसाठी रस्ता खुला केला जाणार आहे. ताणतणावाला बाजूला सारून मनसोक्त आनंद लुटण्यासाठी या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत परिवाराने केले आहे.

Web Title: Dhamal lane to be played today