Devendra Fadnavis on Amit Shah: “मोठा भाऊ कोण हे अमित शाहांनी २०१४ लाच दाखवून दिलंय”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:32 PM2022-04-26T22:32:00+5:302022-04-26T22:33:21+5:30

अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अतिशय सखोल अभ्यास करून त्यावर एक पुस्तक लिहिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis slams shiv sena over some issues and said amit shah wrote book on chhatrapati shivaji maharaj | Devendra Fadnavis on Amit Shah: “मोठा भाऊ कोण हे अमित शाहांनी २०१४ लाच दाखवून दिलंय”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Amit Shah: “मोठा भाऊ कोण हे अमित शाहांनी २०१४ लाच दाखवून दिलंय”: देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई: सन २०१४ मध्ये अचानक शिवसेनेशिवाय लढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, २८८ जागा लढवणार कशा, याची आम्हाला चिंता होती. मात्र, अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, चिंता करू नका. निवडणुकीच्या काळात दीड ते दोन महिने अमित शाह मुंबईत ठाण मांडून बसले होते. २४ तास मुंबईत निवडणुकीची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते की नाही, याची खात्री केली. त्यानंतर जे झाले, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले भाजपच्या १२२ जागा जिंकून आल्या. शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ हे समीकरण अमित शाह यांनी बदलले. संपूर्ण महाराष्ट्राला मोटा भाई कौन छे हे अमित शाह यांनी २०१४ मध्येच दाखवून दिले, अशी बोचरी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. 

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आणखीनच वाढत गेला आहे. अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुंबईत बोलत होते. अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

अमित शाह यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब वत्सल आणि संवेदनशील

अमित शाह यांच्यासोबत काम करतानाच्या अनेक आठवणींना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उजाळा दिला. मित शाह यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब वत्सल आणि संवेदनशील असे आहे. आपल्या नातीशी दिवसभरातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते दररोज बोलत असतात. अमित शाह यांची निर्णय क्षमता अतिशय मोठी आहे. स्वतः दौरे करून अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी काश्मिरच्या ३७० चा निर्णय शक्य करून दाखविला. अमित शाह यांच्या व्यक्तिमत्वाचे मेहनत, त्याग आणि प्रखर राष्ट्रवाद असे अनेक पैलू आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

आजकाल ‘गदाधारी’ हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात

भाषण नाही, तर कृतीत आणून दाखविणारे फार कमी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यातील आपले नेते आहेत. आजकाल ‘गदाधारी’ हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते ‘गधाधारी’ दिसते. अमित शाह यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी अतिशय बारकाईने त्या राज्याचा अभ्यास केला. सर्व निवडणुका लढण्याचा त्यांचा निर्णय हा उत्तर प्रदेशातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. ८० पैकी ७३ जागा जिंकण्याचा विक्रम त्यातून साकारला, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकातून अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपाची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 
 

Web Title: devendra fadnavis slams shiv sena over some issues and said amit shah wrote book on chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.