शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस ॲक्शनमोडमध्ये; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 01:35 PM2023-06-09T13:35:43+5:302023-06-09T13:38:33+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis in action mode in Sharad Pawar threat case; Important orders given to the police | शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस ॲक्शनमोडमध्ये; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश

शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस ॲक्शनमोडमध्ये; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. गेल्या काही दिवसापासून राज्यात नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत. आता शरद पवार यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह ट्विट करत धमकी दिली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.  

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना ज्या ट्विटर हँडलवरुन जी धमकी देण्यात आली त्या खात्याची खात्री करुन कारवाई करण्याची आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊन तास मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी तात्काळ हे आदेश दिले. महाराष्ट्रात अशी धमक्या खपवून घेतले जाणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पवारांना धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक व्हावी: चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवार यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. पवारांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी, असे बावनकुळे म्हणाले. धमकी देणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

'गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी'

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेश बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण अॅडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या काॅमेंटर वाचल्या एवढा द्वेश कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना न्याय मागत आहे. जर काही चुकीच झालं तर त्याला जबाबदार राज्याचं गृहखातं असेल. ज्या विश्वासानं लोक महाराष्ट्रात राहतात त्यांनी आता काय वाटतं असेल. यावर कारवाई व्हावी, असंही खासदार सुळे म्हणाल्या. 

Web Title: Devendra Fadnavis in action mode in Sharad Pawar threat case; Important orders given to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.