प्रियकराच्या हल्ल्यातील मृत मुलीला ८४ टक्के गुण

By Admin | Updated: June 9, 2015 01:35 IST2015-06-09T01:35:36+5:302015-06-09T01:35:36+5:30

दहावीच्या निकालात बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत असतानाच मेघवाडी परिसरातील एका कुटूंबियाचे डोळे मात्र दु:खाने पाणावले.

The deceased girl's 84% ​​marks in the attack | प्रियकराच्या हल्ल्यातील मृत मुलीला ८४ टक्के गुण

प्रियकराच्या हल्ल्यातील मृत मुलीला ८४ टक्के गुण

मुंबई : दहावीच्या निकालात बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत असतानाच मेघवाडी परिसरातील एका कुटूंबियाचे डोळे मात्र दु:खाने पाणावले. या घरातली एकुलती एक मुलगी ८४ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली; परंतू हे यश पाहण्यासाठी ती स्वत: या जगात नसल्याने कुटुंबिय पूर्णपणे खचून गेले आहे.
जोगेश्वरी येथील गुंफा परिसरात राहणारी १७ वर्षीय श्रद्धा ( नाव बदललेले) आई वडिलांसोबत राहत होती. घरातील एकुलती एक मुलगी असल्याने हातावरील तळहाताच्या फोडाप्रमाणे तिच्या कुटूंबियांनी तिला जपले. श्रद्धा अभ्यासातही हुषार होती. दहावीचे वर्ष असल्याने तिने जास्तीत जास्त भर अभ्यासावर दिला होता. मुलगी शिक्षण घेऊन खूप मोठी होणार; हे स्वप्न उराशी बांधुन तिचे बाबा तिचे सर्व हट्ट पुरवत होते. पाहता पाहता दहावीची परिक्षा संपली. परिक्षेत सर्व पेपर मनासारखे गेले; फक्त तिला आता प्रतिक्षा होती ती निकालाची. अशात ६ जूनची रात्र तिच्यासह तिच्या कुटुंबियाच्या स्वप्नांची जणू अखेरची ठरली. श्रद्धाच्या चारित्र्यावर संशय घेत तितेंद्र कुबल (२२) या तिच्या प्रियकराने तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या श्रद्धाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The deceased girl's 84% ​​marks in the attack