Dadra And Nagar Haveli Bypoll: ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 08:24 PM2021-11-02T20:24:00+5:302021-11-02T20:28:53+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या विजयावर भाष्य केलंय. तसेच, आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सहकारी असा उल्लेख करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय.

Dadra And Nagar Haveli Bypoll: This is the calm before the storm, Jitendra Awhad warned the BJP | Dadra And Nagar Haveli Bypoll: ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा

Dadra And Nagar Haveli Bypoll: ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देदादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली

मुंबई - देशात विविध ठिकाणी झालेल्या विधानसभा तसेच लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले. त्यामध्ये बहुतेक सर्वच ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. केंद्रशासित दादरा नगर हवेली (Dadra And Nagar Haveli Bypoll) येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनी ४७ हजारांहून अधिक मतांनी भाजप उमेदवाराला पराभूत केले आहे. या विजयानंतर शिवसेनेचं महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या विजयावर भाष्य केलंय. तसेच, आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सहकारी असा उल्लेख करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय. 'जो मतदारसंघ वर्षानुवर्षे एकाच पक्षाचा होता, त्याच दादरा नगर हवेलीतील लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकारी शिवसेना पक्षाचे उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. खरंतर ही सूचनापूर्व शांतता आहे, येणाऱ्या वादळाची... विशेष अभिनंदन, असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.   


शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही प्रतिक्रिया देत, दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल आहे, असे म्हटले आहे. 

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी मिळवलेल्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत यावर भाष्य केले आहे. या ट्विटमध्ये डेलकर कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळचा फोटो असून इतर दोन फोटो निवडणूक प्रचारातील आहेत. आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांचं विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. 

Web Title: Dadra And Nagar Haveli Bypoll: This is the calm before the storm, Jitendra Awhad warned the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.