दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:19 IST2025-10-28T18:18:43+5:302025-10-28T18:19:45+5:30
Dadar Railway Station Suicide Attempt: कायम गजबज असलेल्या दादर स्थानकावर प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली

दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
Dadar Railway Station Suicide Attempt: मुंबई हे शहर कायमच विविध कारणाने चर्चेत असते. गुन्ह्यांच्या बाबतीतही मुंबईचे नाव अनेकदा चर्चेत येते. अगदी काही दिवसांपूर्वीच काळाचौकी परिसरात (Kala Chowki Crime Case) प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार केला होता आणि नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या विचित्र घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. नेहमी वर्दळीचा असलेल्या काळाचौकी परिसरात असा प्रकार घडल्याची घटना अजूनही ताजी असताना, आता आणखी मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने स्वत:वर वार (Mumbai Man Stabs Self Dadar) करत असल्याचा CCTV फुटेज व्हायरल झाले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Home Guard Saves Man Dadar Station Viral Video Suicide Attempt Mumbai
नेमका काय घडला प्रकार?
दादर रेल्वे स्थानक हे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गजबजलेले आणि कायम वर्दळ असलेले रेल्वे स्थानक आहे. अशा ठिकाणी एका प्रवाशाने चक्क अचानक स्वतःवरच धारदार चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी रेल्वे स्थानकावर ऑन ड्युटी होमगार्डने लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्या तरुणाचे प्राण वाचवले. मात्र, त्यानंतरही त्या प्रवाशाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेऊन (Man attempts suicide train jump) आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Mumbai Railway Staion Crimes)
दादरच्या १२ नंबर प्लॅटफॉर्मवर घडला प्रकार (Mumbai Railway Station Crime)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन होमगार्ड त्या प्रवाशाला अडवत असताना आणि काहीतरी समजावताना दिसत आहेत. याच दरम्यान दादर स्थानकावर एक एक्स्प्रेस ट्रेन येताना दिसते. हे पाहून तो तरुण प्रवाशी ट्रेनच्या दिशेने धावतो आणि ट्रेनच्या पुढ्यात उडी मारायच्या प्रयत्नात असतो. तितक्यात एक होमगार्ड त्याचा पाठलाग करून त्याला वेळीच अडवतो. तरुण स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण होमगार्ड त्याला अजिबात सोडत नाही. हा सगळा प्रकार दादरच्या फलाट क्रमांक १२ वर (Dadar Platform 12 CCTV) घडला.
तरुणाने असा प्रयत्न का केला?
तरुण आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न का करत होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घडलेल्या प्रकाराबाबत रेल्वे पोलिसांना सांगण्यात आले आहे. ते घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र, अशा वर्दळीच्या आणि गजबज असलेल्या दादर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.