नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:38 IST2026-03-25T11:38:35+5:302026-03-25T11:38:35+5:30

मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी नयना वसानी यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

court gives relief to narendra mehta opposition petition dismissed | नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली

नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी नयना वसानी यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. मेहता यांचा उमेदवारी अर्ज कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आला, हे नयना सिद्ध करू शकल्या नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

नरेद्र मेहता यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती भरली आहे. त्यांनी त्यांच्यावर असलेल्या फौजदारी गुन्ह्यांचा, त्यांच्या नावे असलेले शेअर्स, सरकारची थकबाकी तसेच उत्पन्नाचा स्रोताची माहिती दिली नाही, असा आरोप नयना वसानी यांनी याचिकेद्वारे केला होता. मात्र, नरेंद्र मेहता यांनी याचिकेतील आरोप फेटाळले. 

आपल्याविरोधात दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात ‘ए समरी’ रिपोर्ट दाखल करण्यात आला, तर दुसरा गुन्हा अदखलपात्र आहे. आपल्यावर आरोप निश्चित करण्यात आले नाहीत. तसेच कोणतीही सरकारी थकबाकी नाही, असे मेहता यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.मात्र, मेहता यांनी ‘ए समरी रिपोर्ट’ मागे घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली नाही, असे नयना यांनी न्यायालयाला सांगितले.  

वकिलांचा दावा काय?

मेहता यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांत दिलेल्या निकालानुसार  निकषांत बसणारी नाही, असा दावा मेहता यांच्या वकिलांनी केला. यावर याचिकाकतर्तीला नेमकेपणाने काहीही स्पष्ट करता आले नाही, असे म्हणत न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने वसानी यांची  याचिका फेटाळली.

 

Web Title : नरेंद्र मेहता को कोर्ट से राहत; विरोध में याचिका खारिज

Web Summary : उच्च न्यायालय ने भाजपा विधायक नरेंद्र मेहता के चुनाव को चुनौती देने वाली याचिका खारिज की। अदालत ने कहा कि याचिकाकर्ता मेहता के नामांकन में अनियमितता साबित करने में विफल रहे। याचिका में आपराधिक मामलों और वित्तीय विवरणों पर अधूरी जानकारी का आरोप लगाया गया था, जिसे मेहता ने अस्वीकार कर दिया था। अदालत ने मेहता का पक्ष लिया।

Web Title : Court Relieves Narendra Mehta; Petition Against Him Rejected

Web Summary : The High Court dismissed Naina Vasani's petition challenging BJP MLA Narendra Mehta's election. The court noted Vasani failed to prove irregularities in accepting Mehta's nomination form. Vasani alleged incomplete information in Mehta's affidavit regarding criminal cases and financial details, which Mehta denied. The court sided with Mehta.